प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, किचनमध्ये पुरला मृतदेह

शहीदाचे त्यांच्या बाजूला राहणाऱ्या अमित मिश्रा नावाच्या तरुणासोबत सूत जुळले. याविषयी शहीदाच्या पतीला रईसला कळले होते. ११ दिवसांपूर्वी शहीदा आणि अमित यांना रईसने आपल्याच घरात शारीरिक संबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं.

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, किचनमध्ये पुरला मृतदेह
SHARES

प्रियकराच्या मदतीने महिलेने आपल्या पतीची हत्या (murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर महिलेने किचनमध्ये खड्डा खोदून पतीचा मृतदेह पुरला. धक्कादायक म्हणजे महिलेने  हे कृत्य आपल्या सहा वर्षाच्या मुलीच्या समोरच केलं. मुलीच्या जबाबामुळे ही घटना उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी शहीदा शेख हिला अटक केली आहे. तर तिचा प्रियकर फरार झाला आहे. 

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने शहीदाने आपला पती रईस शेख याचा काटा काढला. मुंबई (mumbai) तील दहीसर पूर्व खान कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला रईस शेख याचं २०१२ मध्ये शहीदासोबत लग्न झालं. लग्नानंतर हे दोघेही दहीसरमधील खान कंपाऊंड येथे भाड्याने राहायला होते. दोघांना ६ वर्षीय मुलगी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. 

शहीदाचे त्यांच्या बाजूला राहणाऱ्या अमित मिश्रा नावाच्या तरुणासोबत सूत जुळले. याविषयी शहीदाच्या पतीला रईसला कळले होते. ११ दिवसांपूर्वी शहीदा आणि अमित यांना रईसने आपल्याच घरात शारीरिक संबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं. त्यामुळे शहीदा आणि अमितने रईसला संपवण्याचा प्लॅन केला. दोघांनी चाकून रईसची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये पुरले. हा सगळा प्रकार शहीदाच्या सहा वर्षांच्या मुलीने पाहिला. यानंतर मुलीला बाहेर कुठेही याबाबत सांगितलं तर तुलाही असंच मारुन टाकेन असं धमकावलं.

दरम्यान, रईस अनेक दिवसापासून गायब असल्याची तक्रार त्याच्या मित्राने पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली तरीही रहीम कुठेच सापडत नव्हता. शहीदाने रईसचा मोबाईल आपल्याकडे ठेवून घेत, उत्तर प्रदेशात आपल्या घरी रईस न सांगता कुठेतरी निघून गेला असं सांगायला सुरुवात केली. 

अखेर रईसचा भाऊ मुंबईत आला. त्यानेही भावाची विचारपूस करण्यास सुरुवात केली. ६ वर्षीय मुलीने आपल्या काकाला आईने केलेल्या कृत्याची माहिती दिली. यानंतर रईसच्या भावाने मुलीला घेत दहीसर पोलीस ठाण्यात जाऊन याबद्दल माहिती दिली. मंगळवारी दहीसर पोलिसांनी खान कंपाऊंड भागात कारवाई करत रईसच्या घरातलं किचन खोदलं. या खोदकामात रईसचा मृतदेह सापडला. हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

नवी मुंबईत आता रुग्णालयांमध्येच डिस्चार्जपूर्वी होणार बिलांची तपासणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा