Advertisement

नवी मुंबईत आता रुग्णालयांमध्येच डिस्चार्जपूर्वी होणार बिलांची तपासणी

खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी नवी मुंबई पालिकेने कोविड बिल तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे.

नवी मुंबईत आता रुग्णालयांमध्येच डिस्चार्जपूर्वी होणार बिलांची तपासणी
SHARES

खाजगी कोविड रुग्णालयांमध्ये ((private covid hospital) ) उपचार घेणाऱ्या कोरोना (coronavirus)  रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांच्या तक्रारी संदर्भातील मदतीसाठी नवी मुंबई पालिकेने कोविड बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Center)  सुरू केला आहे. या तक्रारींचे निराकरण करण्यासोबतच रुग्णाचा डिस्चार्ज होण्यापूर्वी रुग्णालयांकडून उपचाराची संभाव्य बिलं घेऊन त्यांची पडताळणी केली जात आहे.

याआधी रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी ४८ तास आधी त्यांची वैद्यकीय बिलं पाठवा, असा आदेश नवी मुंबई पालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) रुग्णालयांना दिला होता. मात्र, आता रुग्णालयांमध्येच डिस्चार्जपूर्वी पालिका अधिकारी बिलांची तपासणी करणार आहेत.  महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी डिस्चार्जपूर्वी देण्यात येणा-या संभाव्य देयकांचे लेखा परीक्षण करण्यासाठी कोरोनावरील उपचार करणाऱ्या रुग्णालयामध्ये महापालिकेचा अधिकारी नियुक्त करावा असे निर्देश दिले आहेत. 

 याआधी १५ मे रोजी झालेल्य विशेष बैठकीमध्ये आयुक्तांनी १ एप्रिलपासूनच्या खाजगी रुग्णालयांमधील देयकांचे लेखा परीक्षण करण्याचे निर्देश दिले होते.  त्याबाबतचा आढावा आयुक्तांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला. रुग्णालयांकडून डिस्चार्जपूर्वी ४८ तास आधी संभाव्य देयके मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेत देयकांचे लेखा परीक्षण करण्यासाठी रुग्णालयांमध्येच महानगरपालिकेचा अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले.

 देयकांच्या पोस्ट ऑडिटपेक्षा प्री ऑडिट करणे रुग्णांच्या व नातेवाईकांच्या दृष्टीने आर्थिक हिताचे व सुविधेचे आहे हे लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये देयकांच्या लेखा परीक्षणासाठी अधिकारी नेमण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नियुक्त अधिकाऱ्याने देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतरच रुग्णाच्या नातेवाईकांनी देयके अदा करावयाचे आहे. त्यास अनुसरून रुग्णालयांची बेड्स क्षमता लक्षात घेऊन तेवढ्या संख्येने अधिका-यांची नेमणूक करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.  

कोविड रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणी करताना कोविडपश्चात निदान होणा-या म्युकरमायकोसिस वरील उपचारांचीही देयके तपासणी करावी असेही आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिसचे उपचार हे सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्येच होऊ शकतात हे लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा असणा-या रुग्णालयांनीच म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी दाखल करून घ्यावेत असेही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. 

 राज्य सरकारने रुग्ण सुविधांचे दर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार देयके आकारणे रुग्णालयांना बंधनकारक असून त्याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या काही तक्रारी असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या 'कोव्हीड बिल तक्रार निवारण कक्ष (Covid Bill Complaint Centre)' येथे ०२२-२७५६७३८९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर तक्रार दाखल करावयाची असल्यास  cbcc@nmmconline.com या ई मेल आय डी वर अथवा ७२०८४९००१० या व्हॉट्स अॅप क्रमांकावर बिलाच्या प्रती पाठवाव्यात असं आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे. 



हेही वाचा -

आता रस्त्यावर थुंकल्यास १२०० रुपये दंड; महापालिकेचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई विमानतळाला फटका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा