Advertisement

गुरुवारी मुंबईतील लसीकरण बंद, 'या' दिवशी मिळणार लस

३ जून म्हणजेच गुरुवारी कोरोना लस (Corona vaccination) घ्यायला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

गुरुवारी मुंबईतील लसीकरण बंद, 'या' दिवशी मिळणार लस
SHARES

३ जून म्हणजेच गुरुवारी कोरोना लस (Corona vaccination) घ्यायला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेनं (BMC) लसीकरणाबाबत मोठी माहिती दिली आहे. गुरुवारी मुंबईतील लसीकरण (Corona vaccination in mumbai) बंद असणार आहे, असं पालिकेनं सांगितलं आहे.

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ०३ जून, २०२१ मुंबईत लसीकरण होणार नाही. असं बीएमसीने जारी केलं आहे. त्यामुळे मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार आहे.

गुरुवारी दिवसभरामध्ये लसीचा साठा प्राप्त होण्याची शक्यता आहे. लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील दिवसापासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्यानं कळवलं जाईल, असं पालिकेनं सांगितलं आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही पालिकेनं केलं आहे.

दरम्यान, राज्यात आणि देशात सध्या लशींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळं १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे ४५ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण करण्यातही तुटवड्यामुळं विघ्न येत आहेत. तर खासगी क्षेत्रात लसीकरण विनाअडथळा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.

या मुद्द्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) यांनीही बोट ठेवलं आहे. केंद्र सरकार खासगी क्षेत्राला पैसे घेऊन लस पुरवठा करत आहे. त्याप्रमाणेच राज्य आणि महापालिकेला लस पुरवठा करावा, आम्हीही पैसे देतो. इतकंच नाही, तर लोकांना ही लस मोफत देतोय, असं म्हणत पेडणेकर यांनी केंद्रावर निशाणा साधला.

'मला अशी माहिती मिळाली आहे की, खासगी रुग्णालये केंद्राकडून विकत घेऊन लसीकरण करत आहेत. त्यांच्याकडून लस घेण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत आहेत. महापालिकेकडे तसं नाही. महापालिका लोकांना मोफत लस देत आहे आणि मोफतच देणार. आम्ही केंद्राला लशींसाठी पैसे द्यायला तयार आहोत, पण तो पुरवठा महापालिकेला मिळत नाही. केंद्राकडून ज्याप्रमाणे खासगी क्षेत्राला लस पुरवली जात आहे, त्याचप्रमाणे त्याच किमतीत आम्हाला लस द्यावी. राज्य सरकार, महानगरपालिका पैसे देऊन लस खरेदीसाठी तयार आहे', असं महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.



मुंबई महापालिकेतील सॅप प्रणाली ११ ते २८ जूनपर्यंत बंद

कर्तव्य बजावताना पालिकेच्या २००हून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा