Advertisement

आम्हीही पैसे देतो, केंद्रानं लस द्यावी - किशोरी पेडणेकर

वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यानुसार राज्यभरात लसीकरण केलं जात आहे.

आम्हीही पैसे देतो, केंद्रानं लस द्यावी - किशोरी पेडणेकर
SHARES

वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यानुसार राज्यभरात लसीकरण केलं जात आहे. मात्र, असं असलं तरी राज्यात आणि देशात सध्या लशींचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळं १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे ४५ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण करण्यातही तुटवड्यामुळं विघ्न येत आहेत. तर खासगी क्षेत्रात लसीकरण विनाअडथळा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.

या मुद्द्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) यांनीही बोट ठेवलं आहे. केंद्र सरकार खासगी क्षेत्राला पैसे घेऊन लस पुरवठा करत आहे. त्याप्रमाणेच राज्य आणि महापालिकेला लस पुरवठा करावा, आम्हीही पैसे देतो. इतकंच नाही, तर लोकांना ही लस मोफत देतोय, असं म्हणत पेडणेकर यांनी केंद्रावर निशाणा साधला.

'मला अशी माहिती मिळाली आहे की, खासगी रुग्णालये केंद्राकडून विकत घेऊन लसीकरण करत आहेत. त्यांच्याकडून लस घेण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत आहेत. महापालिकेकडे तसं नाही. महापालिका लोकांना मोफत लस देत आहे आणि मोफतच देणार. आम्ही केंद्राला लशींसाठी पैसे द्यायला तयार आहोत, पण तो पुरवठा महापालिकेला मिळत नाही. केंद्राकडून ज्याप्रमाणे खासगी क्षेत्राला लस पुरवली जात आहे, त्याचप्रमाणे त्याच किमतीत आम्हाला लस द्यावी. राज्य सरकार, महानगरपालिका पैसे देऊन लस खरेदीसाठी तयार आहे', असं महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

'केंद्रानं आम्हाला लस पुरवावी, आम्ही लोकांना मोफत देतो. पण, केंद्र सरकार महापालिकेला न देता खासगी क्षेत्राला देत आहेत. त्यामुळं कुणी १ हजार रुपयाला, कुणी १२००, तर कुणी १८०० लस विकत आहेत. गरीब-श्रीमंत भेदभाव न करता सगळ्या मुंबईकरांना लस देतोय. लशींसाठी केंद्राला पैसे द्यायला तयार आहोत, मुख्यमंत्र्यांनीही १२ कोटी एकरकमी देण्याची तयारी दाखवली आहे. पण काय होतंय हेच कळत नाही. सगळा संभ्रम आहे. महापालिकेला ज्यावेळीही लस मिळाली, सगळी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. लोकांना मोफत लस दिली गेली', अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.हेही वाचा -

देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

कोरोनामुळं अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये- सुप्रिया सुळे


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा