Advertisement

देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

राजकीय वर्तुळात नव्या भेटीची चर्चा रंगते ती म्हणजे एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट.

देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
SHARES

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. अशातच आता राजकीय वर्तुळात नव्या भेटीची चर्चा रंगते ती म्हणजे एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट. एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात खडसेंच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर लगेचच खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. ३१ मे रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली.

हेही वाचा - पवार-फडणवीस भेटीचा चुकीचा अर्थ काढू नका - नवाब मलिक

यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.

'फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे', असं रक्षा खडसे यांनी फडणवीसांच्या भेटीबद्दल म्हटलं.



हेही वाचा -

शरद पवारांच्या भेटीला राजकीय अन्वयार्थ नाही- देवेंद्र फडणवीस

कोरोनामुळं अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये- सुप्रिया सुळे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा