Advertisement

शरद पवारांच्या भेटीला राजकीय अन्वयार्थ नाही- देवेंद्र फडणवीस

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना सदिच्छा देण्यासाठी ही भेट होती. आमच्या या भेटीला कुठलाही राजकीय अन्वयार्थ नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या भेटीला राजकीय अन्वयार्थ नाही- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आलेलं असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्याबाबत खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ते गेले होते. त्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, फडणवीस यांनी खुलासा केला की, शरद पवार साहेबांची मी जी भेट घेतली ती केवळ सदिच्छा भेट होती. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की मध्यंतरी शरद पवार आजारी होते. त्यांची तीन आॅपरेशन्स देखील झाले. त्यामुळे केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना सदिच्छा देण्यासाठी ही भेट होती. आमच्या या भेटीला कुठलाही राजकीय अन्वयार्थ नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- मराठा आरक्षण: राज्याच्या निर्णयात काही नवीन नाही- देवेंद फडणवीस

त्याचसोबत, शस्त्रक्रिया झाल्यावर शरद पवार रुग्णालयात होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस घरी विश्रांती घेत होते. अनेक लोकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भेट घेतली आहे. यामध्ये बाकी काही नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात व्यक्तिगत नाती टिकवली जातात. तसंच, व्यक्तिगत भेटीगाठी या होतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणं चुकीचं आहे. महाविकास आघाडी पवारांनी बनवली आहे. त्यामुळं कोणी या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करु नये, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस- शरद पवार यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. या भेटीमुळं ऑपरेशन लोटस वगैरे घडणार नाही, असं खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलं आहे. फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आहेत. शरद पवार राज्यातील आणि देशातील मोठे नेते आहेत. ही एक सदिच्छा भेट होती. यामुळे राजकारण तापणार नाही. 

(devendra fadnavis clarifies over meeting with sharad pawar)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा