Advertisement

पवार-फडणवीस भेटीचा चुकीचा अर्थ काढू नका - नवाब मलिक

शरद पवार यांच्या मुंबईतील (mumbai) सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी फडणवीस सोमवारी त्यांच्या भेटीला गेले होते. फडणवीस यांनीच ट्वीट करून या भेटीची माहिती दिली होती.

पवार-फडणवीस भेटीचा चुकीचा अर्थ काढू नका - नवाब मलिक
SHARES

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.  मात्र, या भेटीचा चुकीचा अर्थ काढू नका, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी केलं आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील (mumbai) सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी फडणवीस सोमवारी त्यांच्या भेटीला गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनीच ट्वीट करून या भेटीची माहिती दिली होती. त्यानंतर पुन्हा राजकीय भूकंप येणार का?, असे अंदाज वर्तवण्यात येत होते. मात्र, नवाब मलिक यांना या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

शस्त्रक्रिया झाल्यावर शरद पवार रुग्णालयात होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस घरी विश्रांती घेत होते.  अनेक लोकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भेट घेतली आहे. यामध्ये बाकी काही नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रात व्यक्तिगत नाती टिकवली जातात. तसंच, व्यक्तिगत भेटीगाठी या होतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणं चुकीचं आहे. महाविकास आघाडी पवारांनी बनवली आहे. त्यामुळं कोणी या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करु नये, असं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस- शरद पवार यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. या भेटीमुळं ऑपरेशन लोटस वगैरे घडणार नाही, असं खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलं आहे.  फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आहेत. शरद पवार राज्यातील आणि देशातील मोठे नेते आहेत. ही एक सदिच्छा भेट होती. यामुळे राजकारण तापणार नाही. 

कोरोना संकटात विरोधी पक्षाने कशाप्रकारे भूमिका घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करण्याची गरज आहे यासंबंधी शरद पवरांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल, असं संजय राऊत म्हणाले. 

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात आपली परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे राजकारणात आपण शत्रुत्व घेऊन बसत नाही. भेटीगाठी, चर्चा होत असते. त्यामुळे या भेटीकडे फार राजकीय हेतूनं पाहणं चुकीचं आहे. विरोधी पक्ष ज्याप्रकारे सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत राहिला तर पुढची १०० वर्षे तुमची सत्ता येणार नाही, हे नक्कीच पवारांनी फडणवीसांना सांगितलं असेल, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.



हेही वाचा - 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज

  1. मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा