पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गॅस पाईपलाईन फुटली

 Mulund
पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गॅस पाईपलाईन फुटली

मुलुंड - मुलुंड पश्चिमेकडील विश्वकर्मा नगरातील मालविहार रोडमधील महानगर गॅस लिमिटेडची पाईपलाईन फुटण्याचा प्रकार घडला आहे. मालविहार रोड मधील गटाराच्या दुरुस्तीचे काम पालिकेतर्फ सुरु होते. रविवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पालिका कामगारांच्या हलगर्जीपणामुळे गॅसची पाईपलाईन फुटली आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात गॅसची गळती होण्यास सुरुवात झाली.

धक्कादायक प्रकार म्हणजे या दुर्घटनेनंतर पालिकेच्या कामगारांनी तिथून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी तेजस ठक्कर यांनी दिली. यानंतर मुलुंड पोलिसांनी आणि अग्निशमनदलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाइर्पमधून गळती सुरूच होती. ज्या ठिकाणी गॅस पुरवठा खंडित करण्याचा कोक होता त्यावर पालिका कामगारांनी रेतीचा ढिगारा केला होता. यामुळे तो रेतीचा ढिगारा बाजूला सारून मग गॅसचा पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे जवळ जवळ दीड ते दोन तास गॅसची गळती सुरूच होती. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने करत आहे. Loading Comments