घाटकोपरमधील सरकत्या जिन्याचं काम तीन महिन्यांत होणार


घाटकोपरमधील सरकत्या जिन्याचं काम तीन महिन्यांत होणार
SHARES

घाटकोपर - स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र.4 जवळील सरकत्या जिन्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिन्याचं काम रखडलं होतं. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात आले आहेत. घाटकोपरच्या सरकत्या जिन्याचं काम अनेक दिवसांपासून रखडलं होतं. पण, सोमवारपासून या कामाला वेग आला आहे. या जिन्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांपासून गरोदर महिलापर्यंत सर्वांनाच होणार आहे. येत्या तीन महिन्यांत सरकता जिना नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असं उपस्टेशन प्रबंधक प्रसाद लौटन यांनी सांगितलं.

संबंधित विषय