SHARE

मुंबई-अहमदाबाद वेस्टर्न एक्स्प्रेस हाय-वेवरील वर्सोवा पूल 14 मे पासून 4 दिवसांसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा पूल 45 वर्ष जुना असून त्याची लांबी 48.5 मीटर इतकी आहे. या पुलाला तडे गेल्याने त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. अवजड वाहनांना या पुलावरून जाण्यास परवानगी नव्हती. फक्त साधारण वाहनंच या पुलावरून जाऊ शकत होते. पण 14 मे रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 17 मे पर्यंत पूल दुरुस्ती कामासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलाच्या शेजारी असलेल्या नवीन पुलावरून मात्र साधारण वजनाची वाहने धावू शकतील. अवजड वाहने ठाणे-भिवंडी मार्गावरून घोडबंदरला येतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार देखभाल दुरुस्तीसाठी हा पूल चार दिवस बंद राहणार आहे. यापूर्वी लाखो रुपये खर्चून या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. पण एक वर्षात पुन्हा या पुलाला तडे गेले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या