Advertisement

पोलीस आयुक्तांकडून महिला पोलिसांना ८ तासांच्या ड्युटीचे गिफ्ट

नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला दिनानिमित्त महिला पोलिसांना अनोखी भेट दिली आहे.

पोलीस आयुक्तांकडून महिला पोलिसांना ८ तासांच्या ड्युटीचे गिफ्ट
SHARES

नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला दिनानिमित्त महिला पोलिसांना अनोखी भेट दिली आहे. आयुक्त संजय पांडे यांनी महिला पोलिसांना केवळ ८ तासंच काम करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यामुळं देशाच्या राजधानीला नराधमांच्या कचाट्यातून सुरक्षित ठेवणाऱ्या महिला पोलिसांना दिलासा मिळणार आहे.

महिला पोलिसांची ८ तासांची ड्युटी करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आदेश जारी केले. १२ तासांची ड्युटी कागदोपत्री असली तरी ही ड्युटी कधी-कधी १६ ते २४ तासांपर्यंत होते. शिवाय घरकांमांनाही वेळ द्यावा लागतो. त्यामुळं या सर्वाचा परिणाम पोलिसांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासोबतच कौटुंबिक आयुष्यावर होतो. परिणामी आता या महिला पोलिसांची या समस्यांमधून सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मे २०१६ रोजी देवनार पोलीस ठाण्यासोबत काही पोलीस ठाण्यामध्ये ८ तासांच्या ड्युटीचा सुरू करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरू लागल्यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यासाठी पडसळगीकर यांनी प्रयत्न केले.

लॉकडाऊनच्या काळात या सेवा बंद होत काही ठिकाणी १२ तास सेवा, २४ तास आराम ड्युटीची पद्धत सुरू केली. अनलॉकच्या काळात पुन्हा काही पोलीस ठाण्यात ८ तास सेवेला सुरुवात झाली आहे. मात्र त्यानंतर ती पुन्हा बंद पडली.

राज्याचे पोलीस महासंचालक असताना संजय पांडे यांनी राज्यात महिला पोलिसांना आठ तास ड्युटीचे आदेश जारी केले होते. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती. आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पांडे यांनी दुसऱ्या आठवड्यातच महिलांसाठी ८ तास ड्युटीचे आदेश जारी करत त्यांना अनोखी भेट दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा