SHARE

मुंबई - न्यायाधीशांना जर खड्यांचा एवढाच त्रास होत असेल तर शासनाने त्यांना नवीन आलिशान अश्या गाड्या द्याव्यात असा अजब सल्ला वकीलांकडून देण्यात आलाय. असा अजब युक्तीवाद मुंबई महापालिकेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आलाय. काही महिन्यांपूर्वी हायकोर्टाचे न्यायाधीश गौतम पटेल यांनी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविषयी चीफ जस्टीस मोहित शहा यांना पात्र लिहले होतं. या पत्राची गंभीर दखल घेत हायकोर्टानं सुमोटो अंर्तगत याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी सुरु असताना मुंबई महापालिकेनं हा अजब युक्तीवाद केला. त्याचबरोबर यावेळी, "रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत बीएमसी इंजिनियर्सना आरोपीच्या पिंज-यात उभं करण चुकीचं" असल्याचं मत वकिलांनी कोर्टात मांडलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या