Advertisement

५ ते ७ डिसेंबर 'ग्लोबल पॅगोडा' बंद

अनुयायांनी या काळात ग्लोबल पॅगोडा इथं न येण्याचं वाहन पालिका उप आयुक्त (परिमंडळ - ७) डॉ. भाग्यश्री कापसे यांनी केले आहे.

५ ते ७ डिसेंबर 'ग्लोबल पॅगोडा' बंद
SHARES

कोरोनाचा नवीन प्रकार ऑमिक्रॉनचा प्रसार जगभरात वाढत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी व खबरदारीचा उपाय म्हणून ५ ते ७ डिसेंबरदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळं अनुयायांनी या काळात ग्लोबल पॅगोडा इथं न येण्याचं वाहन पालिका उप आयुक्त (परिमंडळ - ७) डॉ. भाग्यश्री कापसे यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी दरवर्षी गोराई येथील ‘ग्लोबल पॅगोडा’ इथं मोठ्या संख्येनं अनुयायी येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने महापालिकेच्या ‘आर मध्य’ विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

उप आयुक्त डॉ. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाचे सहाय्यक आयुक्त हफीज वकार जावेद मन्सुर अली, ‘ग्लोबल पॅगोडा’ चे व्यवस्थापक एस. एस. शिंदे, संबंधित पोलिस निरिक्षक रविंद्र आव्हाड, पोलिस उप निरिक्षक (वाहतूक) संजय सावंत, विभागाचे कार्यकारी अभियंता निवृत्ती गोंधळी यांच्यासह पालिकेचे संबधित अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’ चे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत खबरदारीची उपाययोजना म्हणून रविवार ५ ते मंगळवार ७ डिसेंबर २०२१ या तीन दिवसांच्या कालावधीत ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा