Advertisement

कोरोनाचा वाढता कहर, गोवा सरकारला आली पर्यटनाची लहर

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. अशा परिस्थितीतही गोवा सरकारनं गोवा पर्यटनासाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा वाढता कहर, गोवा सरकारला आली पर्यटनाची लहर
SHARES

भारतामध्ये कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेले तीन महिने लॉकडाऊन असल्यानं लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. आता देखील परिस्थिती फारसी सुधरली नाही. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना केवळ बाहेर जाण्यास परवानगी आहे. अशा परिस्थितीतही गोवा सरकारनं गोवा पर्यटनासाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, गुरुवारपासून गोवा पर्यटनाला आम्ही अनुमती देत आहोत. पण यासाठी काही अटी आहेत. त्याचं पालन करावं लागेल. किनारपट्टीवरील भाग पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. गोव्यातील २५० हॉटेलांनी यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी ४८ तासांमध्ये कोरोनाची चाचणी करणं आवश्यक आहे. अथवा गोव्यात त्यांना कोरोनाची चाचणी करणं अनिवार्य असेल.

  • गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना अगोदरच हॉटेल बुकिंग करावे लागणार आहे.
  • पर्यटकांना कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर करावं लागेल.
  • गोव्यात आल्यानंतर कोरोना टेस्ट करावी लागेल.
  • जर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले तरच पर्यटकांना इतरत्र फिरू देण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे २० मार्च पासून गोव्यात पर्यटन बंद आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचे नुकसान होत होते. अशा परिस्थितीत स्थानिक व्यावसायिकांनी हॉटेल सुरू करण्याची मागणी केली होती. यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा