Advertisement

मुंबईतील कोटींचा सोने व्यापार ठप्प करणार का? सोने व्यापाऱ्यांचा सरकारला सवाल

साेने व्यापाऱ्यांना विचारात न घेताच सरकारने घेतलेल्या या एकतर्फी निर्णयामुळे व्यापाऱ्यांचं किती नुकसान होईल, याचा सरकारने विचार केला आहे का? असा प्रश्न विचारात गोल्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

मुंबईतील कोटींचा सोने व्यापार ठप्प करणार का? सोने व्यापाऱ्यांचा सरकारला सवाल
SHARES

मुंबईतील वाढत्या आगीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या सरकारने काळबादेवीतील सोने व्यवसाय स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दररोज ५० ते ५५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार असून त्याहीपेक्षा भयानक म्हणजे किमान ५ लाख लोकांच्या रोजगारावर सरकार वरवंटा फिरवणार आहे. साेने व्यापाऱ्यांना विचारात न घेताच सरकारने घेतलेल्या या एकतर्फी निर्णयामुळे व्यापाऱ्यांचं किती नुकसान होईल, याचा सरकारने विचार केला आहे का? असा प्रश्न विचारात गोल्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

काळबादेवी भागात राहणारे हरकिशन गोरडीया यांनी लोकशाही दिनानिमित्ताने याप्रकरणी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी येथील सोने उद्योग अन्यत्र स्थलांतर करण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या. या व्यावसायिकांना तीन महिन्याची नोटीस द्यावी. मुंबई महापालिकेने यासंदर्भात बैठक घेऊन कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात दिले.


रोजगारावर संकट

काळबादेवी या तीन किलोमीटरच्या परिसरात जवळपास लहान मोठे असे ४० हजार कारागिरांचे युनिट्स आणि दुकानं आहेत. एवढंच नव्हे, तर अस्थायी स्वरूपात मुंबईत येऊन सोने व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. असे किमान ४ ते ५ लाख लोक इथल्या व्यवसायावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात अवलंबून आहेत. तेव्हा या ठिकाणचे कारखाने आणि दुकाने स्थलांतरीत झाल्यास रोजगारावरही संकट निर्माण होईल.


सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

आमच्या सोन्याच्या सुरक्षेची काळजी कशी घेणार? सोने वाहून आणण्याचा खर्च आपोआप वाढणार. जशी या ठिकाणी सुरक्षा आहे. तशी सुरक्षा इतर ठिकाणी मिळेलच हे कशावरुन? असे एक ना अनेक प्रश्न जैन यांनी उपस्थित केले आहेत. सोने व्यापाऱ्यांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जैन यांनी केली आहे.


गोल्ड हब तयार करा

सरकारने आधी गोल्ड हब तयार करावा. त्या ठिकाणी सगळी सुरक्षा असावी आणि आम्हाला व्यवसाय करण्यासाठी योग्य जागाही निवडावी आणि मग निर्णय घ्यावा, असं मत कुमार जैन यांनी व्यक्त केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा