Advertisement

गोळीबार रोडवर खड्डेदुरुस्तीची धूळफेक


गोळीबार रोडवर खड्डेदुरुस्तीची धूळफेक
SHARES

घाटकोपर - पश्चिमेतील गोळीबार रोडवर जिकडेतिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. गुरुवारी चक्क या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्याचं पाहून स्थानिकांना धक्काच बसला. पण या रस्त्याच्या एलबीएस मार्गाला जोडणाऱ्या भागापुरतीच खड्डेदुरुस्ती करण्यात आली. या धुळफेकीमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले असून सगळ्याच रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी त्यांची मागणी आहे.
'पालिकेने सप्टेंबर महिन्यात या रस्त्यावरचे खड्डे भरले होते. पण त्यानंतर एका दिवसातच खड्ड्यातली खडी उखडून गेली आणि रस्त्याची चाळणी झाली,' असं दुकानदार सुरेश राई यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा