पेंग्विनच्या घरात 'पाळणा' हलणार का ?

 Byculla
पेंग्विनच्या घरात 'पाळणा' हलणार का ?
पेंग्विनच्या घरात 'पाळणा' हलणार का ?
See all
Byculla, Mumbai  -  

मुंबई - मुंबईकरांना लवकरच एक गोड बातमी मिळणार आहे. खुशखबर अशी की राणीच्या बागेत लवकरच पाळणा हलण्याची चिन्ह आहेत. असे अवाक काय होताय? आम्ही बोलतोय ते अंटार्क्टिकाहून आलेल्या सात पेंग्विन संदर्भात. भायखळ्याच्या राणीबागेत सध्या हॅम्बोल्ट पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होत आहे. मार्च आणि एप्रिल हा पेंग्विनचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना आणखी एका चिमुकल्या पेंग्विनचे दर्शन होऊ शकते.

पेंग्विनसाठी तयार करण्यात आलेल्या खास कक्षात पेंग्विन निर्धास्त आणि मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. पेंग्विनसाठी बनवण्यात आलेल्या खास घरात हे पेंग्विन आता रुळायला लागले आहेत. सध्या सात पेंग्विन्स राणीच्या बागेत आहेत. त्यामध्ये तीन नर आणि चार मादी पेंग्विन आहेत. अडीच आणि तीन वर्षांचे हे पेंग्विन आहेत. या वयातच ते आपला जोडीदार शोधतात. वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर ते प्रजनन करू शकतात. प्रजनन करण्याचे त्यांचे दोन काळ असतात.
पहिला मार्च ते एप्रिल आणि दुसरा ऑक्टोबर ते नोव्हेंबर. सध्या राणीबागेत असलेल्या सातपैकी तीन पेंग्विन्सनी तर आपले जोडीदारही शोधले आहेत. नवीन घरात येण्याआधी त्यांच्या दोन जोड्या तयार झाल्या होत्या. तर एक जोडी या नव्या कक्षात तयार झाली. त्यांची नावे प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर्सवर ठेवण्यात आली आहेत. पॉपॉय-ऑलिव्ह, मोल्ट-बबल्स आणि डोनाल्ड-डेझीी अशा या तीन जोड्यांची नावे आहेत. तर फ्लिपर या फिमेल पेंग्विनला अजून तिचा जोडीदार मिळालेला नाही.

या तीन जोड्या पूर्ण दिवस एकमेकांसोबतच वेळ घालवतात. नवीन कक्षात जलविहार करतात. त्यांची प्रेम व्यक्त करण्याची वेगळीच तऱ्हा आहे. नर पेंग्विनशी संबंध आल्यानंतर साधारण दीड महिन्यात मादी पेंग्विन अंडी देते. एकावेळी ती एक किंवा दोन अंडी देऊ शकते. अवघ्या दीड महिन्यात बेबी पेंग्विन अंड्यातून बाहेर येते.

Loading Comments