Advertisement

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर
SHARES

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सरकारने यासंदर्भातील आदेश नुकताच जारी केला आहे. यापूर्वी महागाई भत्ता 125 टक्के इतका होता. तो आता 132 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2016 पासून लागू करण्यात आला असून, 9 महिन्यांची थकबाकी रोख स्वरुपात मिळणार आहे. राज्य सरकारचे तब्बल 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा