Advertisement

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्रामास मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्रामास मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
SHARES

जोगेश्वरी (पूर्व) येथील पूनमनगर परिसरात असलेल्या मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्रामस अल्पवधीतच मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिल्पांच्या माध्यमातून १२ बलुतेदारांच्या कला कौशल्याची ओळख, विविध भारतीय नृत्यशैलीवरील आकर्षक आणि माहितीपूर्ण शिल्प, संगीतमय कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश असलेल्या या शिल्पग्रामास रविवारी २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली. यामुळे रविवारच्या दिवशी शिल्पग्रामास नियमित नागरिकांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिल्यानं गर्दीचा उच्चांक नोंदवला गेला.


जोगेश्वरी पूर्वेतील वेरावली जलाशयाजवळ असणाऱ्या महापालिकेच्या ३ लाख ७० हजार पेक्षा अधिक क्षेत्रफळावर मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उभारण्यात आलं आहे. १४ ऑक्टोबर रोजीच या शिल्पाग्रामाचं लोकापर्ण करण्यात आलं. यानिमित्तानं मुंबईकरांना पर्यटनाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.


देशभरातील विविध कला शिल्पाच्या माध्यमातून दाखवल्या जाव्यात तसंच नवीन पिढीला विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील कला आणि संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी या शिल्पग्रामाची निर्मिती करण्यात आली आहे. हे शिल्पग्राम सकाळी ६ ते ९ या वेळेत आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत खुलं राहणार आहे.


गेल्या रविवारीच सुरू झालेल्या या शिल्पग्रामाला अल्पवधीतच मिळालेला प्रतिसाद पाहता नागरिकांच्या सुविधेसाठी रविवारसह प्रत्येक सुट्टीच्या दिवशी अधिक सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा