Advertisement

सरकारी विमानसेवा कंपनी एअर इंडिया होणार प्लास्टिकमुक्त

पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी महापालिका अनेक प्रयत्न करत आहेत. अशातच सरकारी विमानसेवा कंपनी एअर इंडिया ही २ ऑक्टोबरपासून पूर्णपणे प्लास्टिकमुक्त होणार आहे.

सरकारी विमानसेवा कंपनी एअर इंडिया होणार प्लास्टिकमुक्त
SHARES

पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी महापालिका अनेक प्रयत्न करत आहेत. अशातच सरकारी विमानसेवा कंपनी एअर इंडिया ही २ ऑक्टोबरपासून पूर्णपणे प्लास्टिकमुक्त होणार आहे. एअर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या एअर इंडियासह एकूण ३ प्रकारच्या सेवा आहेत. या तिन्ही सेवांमध्ये प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी कंपनीनं ८ प्रमुख निर्णय घेतले आहेत.

सर्व उड्डाणे प्लास्टिकमुक्त 

या प्लॅस्टीकमुक्तीची सुरुवात गुरुवारी अलायन्स एअर व एअर इंडिया एक्स्प्रेसची सर्व उड्डाणे प्लास्टिकमुक्त करण्यापासून झाली आहे. तसंच, कंपनीनं प्लॅस्टीकमुक्तीसाठी बनविलेले निर्णय सुरुवातीला एअर इंडिया वगळता अन्य २ सेवांमध्ये लागू करण्यात येणार आहेत. त्याशिवाय, एअर इंडियात हा निर्णय गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबरपासून अंमलात आणला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

टप्प्याटप्प्यानं बंद

मुंबईहून अलायन्स एअर व एअर इंडिया एक्स्प्रेसची सर्व उड्डाणं गुरुवारपासून प्लास्टिकमुक्त झाली आहेत. एअर इंडियाची जवळपास १५० उड्डाणं आहेत. त्यामध्ये पुढील महिन्यात प्लास्टिकचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार आहे. तसंच, उर्वरित सर्व विमानतळांवरही एअर इंडियानं प्लास्टिकचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लास्टिकचा वापर बंद

  • केळ्याचे चिप्स व सँडविच कागदाच्या पाकिटात.
  • प्लास्टिक टाळण्यासाठी केकऐवजी मिळणार मफिन्स.
  • जेवण मिळणार लाकडाच्या प्लेट्समध्ये.
  • क्रु सदस्यांसाठी प्लास्टिक ऐवजी हलकी स्टीलची ताटे.
  • पिण्याचे पाणी व चहा कागदाच्या पेल्यात.



हेही वाचा -

भाजपात मेगाभरती पार्ट २, कोण कोण जाणार?

ग्रॅन्ट रोडमधील कुंटणखाण्यातून ११ बांग्लादेशी तरुणींची सुटका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा