Advertisement

राष्ट्रीयकृत बँकेत खातं उघडण्यासाठी 2 महिने मुदत द्या, सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी

वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेतच खाते उघडण्याची सक्ती राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना केली आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे बहुतांशी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडता आलेले नाही.

राष्ट्रीयकृत बँकेत खातं उघडण्यासाठी 2 महिने मुदत द्या, सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी
SHARES

वेतनासाठी राष्ट्रीयकृत बँकेतच खाते उघडण्याची सक्ती राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना केली आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे बहुतांशी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते उघडता आलेले नाही. परिणामी एप्रिल महिन्याचे वेतन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी  सरकारने दोन महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई राज्य
सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे.

गेली अनेक वर्षे सरकारच्या नियमानुसार राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच काही निवडक खासगी
बँकांमधून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येतात.  राज्याच्या वित्त विभागाने १३ मार्च २०२० रोजी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन फक्त राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत अदा करावेत, असे आदेश जारी केले आहेत. मात्र, त्यानंतर राज्यात लगेच लॉकडाउन सुरू झाल्याने अनेक सरकारी विभागांना बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेत बदलण्याची कार्यवाही करता आलेली नाही.

संचारबंदी काळात  राष्ट्रीयीकृत बँकेत नवीन खाते कसे उघडावे, असा प्रश्न लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पडला आहे. सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करून  राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी  विनंती मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे केली
आहे.

मुंबईतल्या चारही राज्य सरकारी रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिस कोरोनाच्या विरोधात रात्रंदिवस लढा देत असून या सर्वांची पगाराची खाती अॅक्सिस या खासगी बँकेत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणे अतिशय आवश्यक आहे, याकडेही संघटनेने सरकारचे लक्ष वेधले आहे.



हेही वाचा -

मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा