मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश


मुंबई पोलिसांना मोठा दिलासा, ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश
SHARES

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या सर्वच अत्यावश सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ही या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नुकतेच या रोगामुळे मुंबई पोलिस दलातील दोन ज्येष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी  पोलिस दलातील 55 वर्षावरील कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मुंबईतील पोलीस अहोरात्र सेवा करत आहे. त्यामुळे अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मृत पोलिसाला २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता .त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्य झाला.ही घटना होऊन 24 तास उलटत नाही तोच आणखी एका ज्येष्ठ पोलिसांचा या महामारीने बळी घेतला. आतापर्यंत राज्यात 96 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 15 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात आता कोरोनाची लागण होऊन मुंबईत पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दल हादरलं.


स्वभवतालची गंभीर परिस्थिती लक्षात घेता. मुंबई पोलिस आयुक्तांनी पोलिस दलातील 55 वर्षाहून अधिक वयोमान असलेल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना आता कामावर न येण्याच्या सूचना केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचे वाढते वय लक्षात घेता. कोरोना सारखा महाभयंकर संसर्ग ज्येेष्ठ कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याने आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.


आयुक्तांनी घेतले हे महत्वाचे निर्णय


1)  55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व कर्मचार्‍यांना घरीच राहण्यास सांगितले आहे.
2) मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादीसारख्या पूर्वीच्या वैद्यकीय परिस्थितीसह 52 वर्षांवरील सर्व कर्मचार्‍यांनाही घरी रहाण्यास सांगितले गेले आहे.
3) 3 मे पर्यंत पोलिस स्टेशनचे कर्मचारी 12 तास ड्युटी / 2 तास विश्रांती शिफ्ट सिस्टमवर कार्यरत असतील.
4) वैद्यकीय देखरेखीखाली 12 हजार जवानांसाठी 'एचसीक्यू टॅबलेट' पुरविल्या जात आहेत

5) प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी  जवानांना मल्टीविटामिन आणि प्रथिने पूरक आहार पुरविला जात आहे

6)पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विशेष रुग्णालये नियुक्त केली जात आहेत. तसेच मुंबईतील सर्व कोविड रुग्णालयांनी मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था केली आहे.
7) कोविड -19  शी संबंधित शंका किंवा अडचणी दूर करण्यासाठी नियंत्रण कक्षात पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियांकरिता विशेष कोविड हेल्पलाईन क्रमांक तयार केला आहे. 

8) सर्व कर्मचार्‍यांना पुरेशा प्रमाणात पीपीई, फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स, हातमोजे, चेहरा शिल्ड पुरविल्या गेल्या आहेत.

9) खाद्यपदार्थांची पाकिटे, रेशन, गरम पाण्याचे फ्लास्क, चेकपॉईंटवरील पंडाळे इत्यादी सुविधा सर्व कर्मचार्‍यांना फ्रंटलाइन कर्तव्यावर प्रदान केल्या जात आहेत.
10) तसेच कर्तव्य बजावणाऱ्या  सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही उपलब्ध करुन दिली जात आहे.
11) सरकारने कोविडशी लढताना आपला जीव गमावणाऱ्या सर्व कर्मचार्‍यांना 50 लाख रुपयांची मदत व कुटुंबातील सदस्याला शासकिय नोकरी जाहीर केली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा