येस बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि लाॅकडाऊनच्या काळात संचारबंदीचा आदेश मोडून मुंबईहून महाबळेश्वरला गेलेले दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (DHFL) चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान या बंधूंना (wadhawan brothers) सीबीआयने (CBI) रविवार २६ एप्रिल रोजी आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. वाधवान बंधूंना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना आपल्या ताब्यात घेण्याची विनंती महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला केली होती.
जामिनावर बाहेर
कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना २७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मयत गँगस्टर इक्बाल मिर्चीशी राहिलेल्या कनेक्शनवरून ईडीने ही कारवाई केली होती. मनी लॉन्डरिंग कायद्याखाली वाधवान यांना अटक झाली होती. त्यानंतर मुंबईतील पीएमएलए कोर्टाने २१ फेब्रुवारी रोजी वाधवान यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.
A #CBI team has taken both Kapil and Dhiraj Wadhwan into custody.@SataraPolice has given them all required assistance & an escort vehicle with 1+3 guard upto Mumbai on a written request.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 26, 2020
The arrest procedures are going on.#LawEqualForAll
शिफारस पत्र मिळवलं
राज्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लाॅकडाऊन करण्यात आलेलं असताना गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (special principal secretory amithabh gupta) यांच्या विशेष परवानगीचं शिफारस पत्र घेऊन वाधवान बंधू आपलं कुटुंब आणि नोकरचाकरासह बेकायदेशीररित्या प्रवास करून आधी मुंबई ते खंडाळा आणि तिथून पुढे महाबळेश्वरला गेले. तिथं पाचगणी पोलिसांनी वाधवान कुटुंबातील २३ जणांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या सगळ्यांना जवळच्याच महाविद्यालयात क्वारंटाईन (quarantine) करून ठेवण्यात आलं होतं.
विनंती पत्र
दरम्यान, वाधवान कुटंबीयांच्या क्वारंटाइनची वेळ २२ एप्रिल रोजी संपत असल्याने पोलीस खात्यातर्फे ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं असं कळवण्यात आलं होतं. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. सीबीआयने संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे सोपवू, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी दिली होती. त्यानुसार २६ एप्रिल रोजी वाधवान बंधूंना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं.