Advertisement

बाॅलिवूड कलाकार काढणार गाई-म्हशीचं दूध?


बाॅलिवूड कलाकार काढणार गाई-म्हशीचं दूध?
SHARES

बॉलिवूडचे कलाकार गोठ्यात बसून गाई-म्हशीचं दूध काढताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आरेची दूध उत्पादने आणि शासकीय दूध योजनांच्या वाढीसाठी सरकार बाॅलिवूड सेलिब्रेटींना ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा विचार करत असल्याची माहिती दूग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

दूग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत सरकारच्या 'आरे' या ब्रँडचे मार्केटींग करणे आणि आरेच्या विक्री केंद्रांना अधिक सोयी-सुविधा देऊन त्याची मार्केटिंग व्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्णय मंत्रिडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी 'आरे'ची उत्पादने अन्य दुकाने आणि मॉल्समध्ये विकण्यास परवानगी देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.


दुग्धशाळा स्थापन

दुभत्या जनावरांची शास्त्रीय व आधुनिक तंत्रानुसार देखभाल करण्यासाठी तसेच संकरीकरणातून उच्च प्रतीच्या कालवडींची निर्मिती करुन राज्यातील शेतकऱ्यांना माफक दराने पुरविण्यासाठी आरे, पालघर व दापचरी येथे प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रांसह इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी दुग्धशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.


बहुतांश योजना बंद

राज्यातील विविध ठिकाणच्या जमिनींवरील शासनाच्या मालकीच्या १२ दूध योजना आणि ४५ दूध शीतकरण केंद्रे सध्या पूर्णपणे बंद आहेत. मुंबई, पुणे, नांदेड, अहमदनगर इत्यादी ठिकाणच्या उर्वरित २० दूध योजना व २८ शीतकरण केंद्रे भविष्यात बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पीपीपी प्रक्रियेद्वारे दुग्धव्यवसाय विभागातील योजना, शीतकरण केंद्र आदी प्रकल्प चालवायला दिल्यास नव्याने भांडवली गुंतवणूक न करता शासनास मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होऊ शकतो. नूतनीकरण करावयाचे झाल्यास सुमारे २५० ते ३०० कोटी इतका निधी लागण्याची शक्यता असून, जुन्या झालेल्या इमारतींच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जानकरांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा