Advertisement

गर्भलिंग निदान कायद्यातून नेत्रतज्ज्ञांना वगळणार?


गर्भलिंग निदान कायद्यातून नेत्रतज्ज्ञांना वगळणार?
SHARES

गर्भलिंगनिदान म्हणजेच पीसीपीएनडीटी कायद्यातून वगळण्याची मागणी नेत्रतज्ज्ञांकडून सातत्याने केली जात होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री   डॉ. दीपक सावंत यांनी देशभरातील नेत्रतज्ज्ञांना दिले आहेत.

डोळ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सोनोग्राफी मशिनचा वापर गर्भलिंग निदानासाठी करता येतो की नाही, याबाबत आम्ही राज्य सरकारच्या तंत्रज्ञान विभागातील विशेष तज्ज्ञांसोबत चर्चा करू. नेत्रतज्ज्ञांच्या या प्रश्नाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी याआधी चर्चा केली आहे.

डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र

डोळ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सोनोग्राफी मशिनने गर्भाचे निदान करता येत नाही. त्यामुळे सरकारने नेत्रतज्ज्ञांना पीसीपीएनडीटी कायद्यातून वगळण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नेत्रतज्ज्ञांनी केली आहे. मुंबईत झालेल्या तीन दिवसीय नेत्रतज्ज्ञांच्या परिषदेत डॉ. दीपक सावंत यांनी गर्भलिंग निदान कायद्याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

नेत्रतज्ज्ञांकडे असलेल्या सोनोग्राफी मशिनने फक्त तीन सेंटीमीटरपर्यंतच पाहता येऊ शकते. या मशिनने महिलांच्या पोटात असलेल्या गर्भाचे लिंग निदान होणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने गर्भलिंग निदान कायद्यातून नेत्रतज्ज्ञांना वगळावे.

डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय


का जायचे आहे कक्षेबाहेर? 

डोळ्यांचे विविध आजार आणि उपचार पद्धतीबाबत चर्चा करण्यासाठी देशभरातील जवळपास 2 हजार 500 नेत्रतज्ज्ञ मुंबईत एकत्र आले होते. या परिषदेच्या उद्घाटनावेळी बॉम्बे ऑप्थॅल्मॉलॉजी असोसिएशनचे प्रमुख सल्लागार डॉ. तात्याराव लहाने यांनी, पीसीपीएनडीटी, म्हणजेच गर्भलिंगनिदान कायद्यातून नेत्रतज्ज्ञांना वगळण्याची मागणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली.

डॉ. लहाने यांनी सरकारने डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या लेन्सची किंमत नक्की करावी, यासाठीदेखील सरकारकडे आग्रही मागणी केली.

आम्ही जेवढ्या सोनोग्राफी दिवसाला करतो, त्याचा रिपोर्ट आम्हाला सरकारला पाठवावाच लागतो. तसंच आम्हाला गर्भलिंग निदानाबाबत तितकंस माहीतही नाही. त्यामुळे उगाच या कायद्यात आम्हाला ठेवण्यात अर्थ नाही.

डॉ. श्रीधर फाटक, नेत्रतज्ज्ञ

या उद्घाटन सोहळ्यात देशभरातील 26 प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञांना सन्मानित करण्यात आले. त्याचसोबत नेत्रतज्ज्ञांनी गेल्या कित्येक वर्षांत केलेल्या कामाची एक शॉर्टफिल्मसुद्धा दाखवण्यात आली.

आम्ही गायनॅकोलॉजिस्ट नाही. आम्ही फक्त डोळ्यांची सोनोग्राफी करतो. त्यामुळे या कायद्यात आम्हाला ठेवणं गरजेचं नाही. सोनोग्राफी मशिनमुळे फक्त 3 सेेंटिमीटर एवढंच डॉक्टर्स बघू शकतात.

डॉ. रुपाली अभ्यंकर, नेत्रतज्ज्ञ



हेही वाचा - 

रुग्णांना दिलासा कधी?

रुग्ण, डॉक्टरांच्या नात्यासाठी सुसंवाद अभियान


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा