मेट्रो भुयारी मार्ग बंद होणार?

  Mumbai
  मेट्रो भुयारी मार्ग बंद होणार?
  मुंबई  -  

  मुंबई मेट्रो सिनेमाजवळ असलेला भुयारी मार्ग बंद करण्याचा हट्ट राज्य सरकारने धरला आहे. या ठिकाणी चित्रकारांसाठी कलादालन सुरू करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक अवकाश जाधव यांनी पुढे आणला होता. त्यानुसार चर्चाही सुरू होती. मात्र दिल्ली हाटच्या धर्तीवर मुंबई हाट उभारण्याचा कट राज्य सरकारने रचला आहे. त्यामुळे ही चर्चा चर्चाच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासंबंधीचे निर्देशही सरकारकडून पालिकेला देण्यात आले असून आज यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाला तर या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा देत जाधव यांनी सरकारला आव्हान दिले आहे. तर कोणत्याही परिस्थितीत सरकारचा हा घाट यशस्वी होऊ देणार नसल्याचेही त्यांवी स्पष्ट केले आहे. मेट्रो भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या दोन हजार पादचाऱ्यांचे सर्व्हेक्षण करत त्यांना मुंबई हाट हवे का? हे जाणून घेण्यात आले. यामध्ये 98 टक्के पादचाऱ्यांनी मुंबई हाटला विरोध दर्शवत भुयारी मार्गात मंड्या आणि फेरीवाले नको असे स्पष्टपणे नमूद केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.