Advertisement

उघड्यावर शौचास जाल तर...


उघड्यावर शौचास जाल तर...
SHARES

गावांना हागणदारीमुक्त करण्यासाठी गुड मॉर्निंग पथकांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याच प्रमाणे आता राज्यातील सर्व शहरांनाही हागणदारीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने गुड मॉर्निंग पथक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यातील शहरांमध्ये 8.32 लाख कुटुंबांकडे वैयक्तिक घरगुती किंवा सार्वजनिक शौचालय उपलब्ध नाही. 17 मे 2017 पर्यंत राज्यातील सर्व शहरांमध्ये 3.90 लाख शौचालये पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. सध्या 1.91 वैयक्तिक शौचालय बांधण्याची कामे सुरू आहेत.

राज्यातील मुंबईसहित सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी तसेच हागणदारी मुक्तीचा दर्जा टिकवण्यासाठी राज्य सरकारने सर्व शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. गुड मॉर्निंग पथक तयार झाल्यानंतर 2 ऑक्टोबरपासून दररोज सकाळी शहरामध्ये फिरून नागरिकांच्या उघड्यावर शौचास जाण्याची सवय बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत पात्र लाभार्थिंना शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

गुड मॉर्निंग पथकामध्ये कोणाचा असणार समावेश?
1) स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी
2) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील बचत गटांचे प्रतिनिधी
3) हागणदारी मुक्तीबाबत काम केलेल्या किंवा या विषयावर आवड असणारे विद्यार्थी
4) विविध समाज घटक तसेच सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी

काय असणार आहे गुड मॉर्निंग पथकाचे कार्य?
1) गुड मॉर्निंग पथक सकाळी शहरात फिरून नागरिकांची उघड्यावर शौचास जाण्याची सवय बंद करण्याचे कार्य करणार
2) गुड मॉर्निंग पथक उघड्यावर शौचास जाताना व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तिचे प्रबोधन करणार
3) जो पर्यंत शहरातील उघड्यावर शौच करण्याची सवय पूर्णत बंद होत नाही, तोपर्यंत नागरिकांमध्ये जनजागृती करून मानसिकतेत बदल    घडवून आणण्याचा प्रयत्न करणार

उघड्यावर शौचास बसल्यास काय कारवाई होणार?

1) प्रबोधन करुनही उघड्यावर वारंवार शौचास जाताना आढल्यास अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा