Advertisement

यंदा पावसात मुंबई तुंबणार नाही- पालकमंत्री


यंदा पावसात मुंबई तुंबणार नाही- पालकमंत्री
SHARES

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या अनेक भागात जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळं प्रवाशांसह चाकरमान्यांना तासंतास वाहतुककोंडीत अडकून रहावं लागतं. याबाबत अनेकदा पालिकेकडं तक्रार केली जाते. मात्र तरीही मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. परंतु यंदा पावसाचं पाणी साचणार नाही, असं  आश्वासन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली की, अनेक सखल भागात पाणी साचते. मात्र, यंदा अशी परिस्थिती उद्भवणार नाही. कारण यंदा पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही’, असे आश्वासन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

‘महाराष्ट्र राज्यात भाजप गेले पाच वर्षे होते. त्या ५ वर्षात भाजपने काय केले. तसेच भाजपला औरंगाबादच्या नामांतराबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही’, असा टोला पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा