Advertisement

'तो आमच्यासोबत राहिला असता तर वाचला असता', सोनूच्या भावांचा आक्रोश


'तो आमच्यासोबत राहिला असता तर वाचला असता', सोनूच्या भावांचा आक्रोश
SHARES

'आम्ही सोनूला वारंवार सांगत होतो की कामावर जाऊ नकोस, तरीही सोनू रविवारी कल्याणहून कामावर गेला. त्यानं आमचं एकही ऐकलं नाही'. हा आक्रोश आहे सोनूच्या भावांचा.


खैरणी रोड आग प्रकरण

साकीनाक्याजवळील खैराणी रोड येथील भानू फरसाण दुकानात सोमवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत रामगणेश गुप्ता उर्फ सोनू या १८ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला.


भावांचा आक्रोश

या घटनेबाबत जेव्हा सोनूच्या भावांना कळालं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 'रविवारी कल्याणच्या घरातून रात्री उशिरा कामावर जाण्यासाठी निघालेला सोनू आमच्यात आता नाही ही गोष्टच मुळात न पचणारी' असल्याचं सोनूचा मावस भाऊ अर्जून यांने सांगितलं.

सोनू हा दोन महिन्यांपूर्वी या दुकानात कामाला लागला होता. पैसे कमावण्यासाठी म्हणून हे तिन्ही भाऊ गोरखपूरहून मुंबईत आले. सोनूला मित्राच्या ओळखीने साकीनाक्याजवळील फरसाणच्या दुकानात नोकरी लागली. रोज कल्याणला अपडाऊन करावं लागत असल्यानं तो दुकानात राहायचा. पण, भावाने आपल्यासोबतच रहावं असं त्यांना वाटायचं. याबाबत त्या तिघांचं वारंवार बोलणं व्हायचं.


आम्ही रविवारी सर्व भावंड भेटलो. सोनूला रात्रीच कामावर जाऊ नकोस, तू इथंच कल्याणला राहा, असं आम्ही त्याला किती वेळा समजावलं. पण, आम्हालाही त्याने मैं देखता हूं भाई असं उत्तर दिलं. आम्ही सोमवारी सुट्टी घेऊन परत गावी जाणार होतो. पण तो काही ऐकला नाही.

- अर्जून, सोनूचा मावस भाऊ


हेही वाचा - 

'त्या' दुकान मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मिर्जा कुटुंबियांवर कोसळला दुखाचा डोंगर, एकाच घरातील दोन मुलं गमावली

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा