नाल्यांची सफाई होणार कधी?

 Mandala
नाल्यांची सफाई होणार कधी?

मंडाळा - मंखुर्दच्या मंडाळातील 30 फूट रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यांची मोठी दुरवस्था झालीय. बाराही महिने इथले नाले तुडुंब असल्यानं सांडपाणी नेहमीच रस्त्यावर वाहत असतं. इथल्या रहिवाशांनी याबाबत वारंवार पालिकेकडे तक्रारी केल्यानंतर दोन माहिन्यापूर्वी पालिकेनं गटारांचं काम सुरू केलंय. मात्र यातील अनेक ठिकाणी या गटारांची कामं अर्धवटच राहिलेली आहेत. 'त्यामुळे याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं बाबू शेख या दुकानदारानं सांगितलं'.

Loading Comments