Advertisement

हेअर कट चुकला, महिलेला मिळणार २ कोटींची नुकसान भरपाई

देशातील ग्राहक न्यायालयानं लक्झरी हॉटेल चेन ITC ला ही नुकसान भरपाई भरण्याचे आदेश दिले आहेत.

हेअर कट चुकला, महिलेला मिळणार २ कोटींची नुकसान भरपाई
SHARES

हेअर कट चुकला म्हणून महिलेला २ कोटी रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशातील ग्राहक न्यायालयानं लक्झरी हॉटेल चेन ITC ला ही नुकसान भरपाई भरण्याचे आदेश दिले आहेत. ही बाब एप्रिल २०१८ ची आहे, ज्यावर न्यायालयानं नुकताच आपला निर्णय दिला आहे.

न्यायालयाचं म्हणणं आहे की, आयटीसी मौर्य हॉटेलनं आशना रॉय नावाच्या या महिलेचे लांब केस कापले आणि केसांवर चुकीची ट्रीटमेंट दिली, ज्यामुळे महिलेचे मोठे नुकसान झाले. तिची जीवनशैली बदलली आणि तिचे अव्वल मॉडेल बनण्याचं स्वप्न भंगलं.

ग्राहक न्यायालयाच्या खंडपीठाचे अध्यक्ष आर.के. अग्रवाल आणि सदस्य एस.एम. कांतीकर यांनी महिलेला ही नुकसान भरपाई देण्यास मदत केली. ते म्हणाले की, महिलांना त्यांच्या केसांची खूप काळजी असते. केस सुंदर ठेवण्यासाठी त्या पैसे खर्च करतात आणि याच्याशी त्यांच्या भावना जुळलेल्या असतात.

आशना रॉय तिच्या लांब केसांमुळे हेअर प्रोडक्ट्ससाठी मॉडेलिंग करत असे. तिने अनेक मोठ्या ब्रॅण्ड्ससाठी मॉडेलिंग केलं होतं. पण हॉटेलनं तिच्या सूचनांविरूद्ध तिचे केस कापले, त्यामुळे तिला अनेक मोठ्या असाइनमेंट सोडाव्या लागल्या आणि तिला खूप त्रास सहन करावा लागला. तिला मानसिक त्रास तर सहन करावा लागला आणि तिने नोकरी देखील गमावली.

हॉटेलवर केवळ महिलेचे केस कापण्याचाच नव्हे तर हेअर ट्रीटमेंटमध्ये मेडिकल निष्काळजीपणा करण्याचा आरोपही आहे. न्यायालयानं सांगितलं की, महिलेची टाळू जळाली आहे, ज्यामुळे महिलेला अजूनही अॅलर्जी आणि खाज आहे.

महिलेनं दाखल केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटवरून हे स्पष्ट झाले की हॉटेलनं आपली चूक मान्य केली होती आणि मोफत उपचार देऊन आपली चूक झाकण्याचा प्रयत्न केला होता. ही भरपाई देण्यासाठी कोर्टानं हॉटेलला ८ आठवडे दिले आहेत.



हेही वाचा

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी, आता फक्त ८ तासांची ड्युटी

मुंबई - सिंधुदुर्ग विमानसेवा 'या' तारखेपासून, सर्वसामान्यांना परवडणारी विमानस्वारी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा