Advertisement

मुंबई - सिंधुदुर्ग विमानसेवा 'या' तारखेपासून, सर्वसामान्यांना परवडणारी विमानस्वारी

यासाठी अलायन्स एअर या एअर इंडियाच्या प्रादेशिक उड्डाण उपकंपनीशी करार करण्यात आला आहे.

मुंबई - सिंधुदुर्ग विमानसेवा 'या' तारखेपासून, सर्वसामान्यांना परवडणारी विमानस्वारी
(Representational Image)
SHARES

कोकणात विमानानं जाण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. या विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला होणार आहे. याच दिवसापासून विमानसेवाही सुरु होणार आहे.

मुंबई - सिंधुदुर्ग विमान प्रवास २५०० रूपयांत करता येणार आहे. दीड तासांत मुंबईतून सिंधुदुर्गात पोहोचता येणार आहे. यासाठी अलायन्स एअर या एअर इंडियाच्या प्रादेशिक उड्डाण उपकंपनीशी करार करण्यात आला आहे.

एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर (Alliance Air flying) 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरू करणार आहे. एअर इंडिया लवकरच एका खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू आहे.

ही विमानसेवा केंद्र सरकारच्या RCS Udan Scheme अंतर्गत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आता कोकणात विमानस्वारी उपलब्ध होणार आहे. Alliance Air हे विमान हे ७० सीटर असणार आहे. ATR 72 600 एअरक्राफ्ट मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणार आहे.

मुंबई सिंधुदुर्ग प्रवासासाठी २ हजार ५२० रूपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई फेरीसाठी २ हजार ६२१ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. अलायन्स एअर या मार्गावर दररोज थेट हवाई सेवा सुरू करेल. ही फ्लाईट तिकीट All-inclusive आहे.

Flight 9I 661 हे मुंबई वरून सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी झेपावणार आहे ते सिंधुदुर्ग मध्ये दुपारी १ वाजता पोहचणार आहे. तर Flight 9I 662 हे सिंधुदुर्ग वरून दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी उडणार असून मुंबईला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी येणार आहे.

देशातील हवाई उड्डाणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांतर्गत हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं प्रादेशिक जोडणी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशाच्या छोट्या विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येत आहे.

यासाठी तिकीट आरक्षण २३ सप्टेंबरपासून एअर इंडियाच्या airindia.in या अधिकृत वेबसाईटवर सुरू करण्यात आले आहे, तर १ ऑक्टोबरपासून सिंधुदुर्ग विमानतळावर आरक्षण खिडकी सुरू होईल.



हेही वाचा

ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामाचा मुहूर्त निघाला; मध्यरेल्वेवर १० तासांचा मेगाब्लॉक

विनातिकिट प्रवाशांविरोधात एसटीची तपासणी मोहीम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा