Advertisement

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी, आता फक्त ८ तासांची ड्युटी

महाराष्ट्रातील पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता ८ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी, आता फक्त ८ तासांची ड्युटी
SHARES

महाराष्ट्रातील पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आता ८ तासाची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी महिला पोलिसांचे कामाचे तास हे १२ होते. आता १२ तासांवरुन ८ तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संजय पांडे यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी स्वागत केलं आहे. चार तासांची ड्युटी कपात केल्यानं महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील निर्णयाचं स्वागत केलं आहे.

महाराष्ट्र सरकारनं महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. पोलीस महासंचालक पांडे आणि पोलीस दल, गृह विभानं महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतेय, असं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर ८ तासाचा ड्युटीचा उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी ८ तासांची ड्युटी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणारे अमरावती शहर पोलीस आयुक्त पोलीस तिसरे ठरले होते. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून संपूर्ण राज्यातील महिला पोलिसांना 8 तासांची ड्युटी करायला मिळणार आहे.हेही वाचा

डोंबिवली बलात्कार प्रकरण : विद्या चव्हाण म्हणाल्या...

५० वर्ष जूना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी ३ दिवस बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा