Advertisement

५० वर्ष जूना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी ३ दिवस बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

आता प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागणार आहे.

५० वर्ष जूना वर्सोवा पूल दुरुस्तीसाठी ३ दिवस बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर
(File Image)
SHARES

वर्सोवा इथला जुन्या खाडी पूलाची एक मार्गिका ३ दिवस बंद राहणार आहे. पूलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवार २६ सप्टेंबरपासून मंगळवार २८ सप्टेंबरपर्यंत जड-अवजड वाहनांसाठी जुना पूल बंद करण्यात येणार आहे.

दरम्यान या मार्गावरील वाहतुक वळवण्यात आली आहे. ठाणे मुंबई येथून पालघर गुजरातकडे जाणारी जड अवजड वाहनांना पर्यायी मार्गावरुन वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर हलकी वाहनं ही जुन्या पुलाच्या एका मार्गीकेकडून चालू राहतील.

पण महसूल विभागाची वाहने पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने इत्यादी वाहनांना हा नियम लागू राहणार नाही.

आयआरबीनं पोलिसांकडे २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत सलग ५ दिवस पूल बंद ठेवण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी आयआरबीला रविवार २६ सप्टेंबर ते मंगळवार २८ सप्टेंबर २०२१ पर्यंत तीन दिवसांसाठी जुन्या पूलाची एक मार्गीका बंद ठेवण्याची परवानगी दिली आहे.

त्यामुळे जुन्या पुलाच्या एका मार्गीकेतून हलकी वाहनं वाहतुकीसाठी खुली असणार आहेत. यावेळी गुजरातकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना वर्सोवा पुलाकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्या वाहनांची वाहतूक खालील तीन पर्यायी मार्गांवरुन वळवण्यात येणार आहे.

‘या’ मार्गांवर वळवण्यात आली वाहतूक

ठाणे शहरातून वर्सोवा मार्गे पालघर सुरत बाजूकडे येणारी जड-अवजड वाहनं ही मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-भिवंडी-वाडा-मनोर-पालघर-मार्गे जातील.

मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-भिंवडी-नदी नाक-अंबाडी-वज्रेश्वरी-गणेशपूरी-शिरसाट फाटा मार्गे जातील.

मुंब्रा-खारेगाव टोलनाका-मानकोली-अंजूर फाटा-कामण-चिंचोटी-वसई विरार महानगरपालिका हद्दी मार्गे जातील.

यापूर्वी जुना वर्सोवा पुलाला तडे गेल्यानं पहिल्यांदा दिनांक २४ डिसेंबर २०१३ रोजी हा पूल सहा महिने बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१६ ला या पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. एकदिशा मार्ग सुरु ठेवण्यात आला होता. एकेरी वाहुतक २० मिनिटं सुरू ठेवली जात असल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता.

११ जून २०१४ पासून १५ टनांपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांना बंदी घातली आहे. तसंच बंदीचे आदेश ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. तरीही सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.



हेही वाचा

मुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत राज्यात नव्या प्रकल्पांना बंदी, न्यायालयाची तंबी

१२ जुन्या उड्डाणपुलांच्या जागी नव्या केबल पुलची उभारणी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा