Advertisement

मुंबईत हज हाऊसने फडकवला सर्वात उंच तिरंगा


मुंबईत हज हाऊसने फडकवला सर्वात उंच तिरंगा
SHARES

मुंबईतील हज हाऊसने आपल्या छतावर देशातील सर्वात मोठा तिरंगा लावला आहे. या तिरंग्याची लांबी आणि रूंदी २०x३० फूट असून हा झेंडा जमिनीपासून ३५० फूट उंचीवर आहे. बुधवारी केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते हा झेंडा फडकवण्यात आला.


इमारतीच्या छतावर

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जवळील हज हाऊसच्या छतावर हा तिरंगा फडकवण्यात आला आहे. हा तिरंगा देशातील कुठल्याही इमारतीच्या छतावर लावण्यात आलेल्या तिरंग्यांपैकी सर्वात उंच तिरंगा ठरला आहे.


निवासाची व्यवस्था

सन १९८७ मध्ये हज हाऊस बांधण्यात आलं होतं. हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या निवासाची तसंच त्यांच्या यात्रेची व्यवस्था हज हाऊसमधून करण्यात येते.



हेही वाचा-

मुंबईतील पाच एसटी बस थांबे कात टाकणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा