Advertisement

हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल

दरम्यान, हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल
SHARES

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईच्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी फोनवरुन देण्यात आली आहे. दरम्यान, हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये धमकीचे फोन येण्याचं सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या फोनवरुन देण्यात आली आहे. फोन आल्यानंतर तात्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याव्यतिरिक्त बीडीडीएस, कॉन्वेंट वेनलाही पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रोजेक्ट साइटची तपासणी केली. पण कोणालाच काही सापडलं नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धमकी आलेल्या फोनवर पुन्हा फोन केला, त्यावेळी तो फोन बंद आला. धमकीचा फोन करणारी व्यक्ती उल्हासनगरची असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

२० ऑगस्ट २०२२ ला देखील मुंबई पोलिसांना धमकीचा मॅसेज आला होता. यात 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी अज्ञातांनी दिली होती. त्यावेळीही पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला होता, मात्र हा फोनकॉल देखील खोटा आणि अफवेचा होता.

पोलिसांना अनेकदा असे फोन येत असतात. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून तात्काळ सुरक्षेचा आढावा घेतला जातो, तपासणी केली जाते. मात्र, नंतर अशा बातम्या खोट्या असल्याचं अनेकदा समोर आलं आहे.



हेही वाचा

केईएम रुग्णालयातील नर्सच्या क्वार्टरमध्ये स्लॅब कोसळला, 1 जखमी

अमृता फडणवीस, सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, Y+ सुरक्षा कवच

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा