Advertisement

वांद्रेतील जॉगर्स पार्कवर पालिकेचा डोळा?


SHARES

वांद्रे - येथील प्रसिद्ध जॉगर्स पार्क आता पालिकेच्या घशात जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्कची देखभाल वैभव ट्रस्ट करते मात्र आता देखभालीसाठी पालिकेने अचानक पुढाकार घेतला आहे. मात्र या पार्कची देखभाल वैभव ट्रस्टकडूनच केली जावी यासाठी बुधवारी संध्याकाळी स्वाक्षरी मोहिम राबण्यात आली. या मोहिमेला जवळपास पार्कमध्ये फेरफटका मारायला आलेल्या 10 हजार जॉगर्सनी सहभाग घेतला. आता 2 रुपये प्रवेश शुल्क आकारून या पार्कमध्ये प्रवेश दिला जातो. पालिकेने देखभाल केली तर हे पार्क प्रवेशशुल्क न आकारता नागरिकांस खुले होईल परंतु ते किती स्वच्छ असेल त्याची किती देखभाल होईल याची शाश्वती नसल्याचा दावा वैभव ट्रस्टच्या सदस्या शामा कुलकर्णी यांनी केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा