Advertisement

भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन

मुंबईसह संपूर्ण देशभरात मंगळवार २६ जानेवारी २०२१ रोजी भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन
SHARES

मुंबईसह संपूर्ण देशभरात मंगळवार २६ जानेवारी २०२१ रोजी भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यंदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ३ नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी देशाची राजधानी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, मुंबईच्या आझाद मैदानात ही असंख्य शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, २६ जानेवारी १९५० रोजी भारतानं संविधानाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. यामुळं दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात देशाच्या सैन्याची ताकद पाहायला मिळणार आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी भारतीय हवाई दलात नव्यानं सामील झालेली राफेल विमानही परेडमध्ये प्रात्यक्षिके करताना दिसणार आहेत. यासोबतच टी-९० टँक आणि सुखोई-३० एमके आय लढाऊ विमानंही या संचलनात सामील असणार आहेत.

सरंक्षण मंत्रालयकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे रथ पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सरंक्षण मंत्रालयाच्या ६ रथही यंदा परेडमध्ये असणार आहेत. निमलष्करी दलाचे ९ रथ राजपथावर संचलन करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आत्मनिर्भर भारत आणि फिट इंडिया मूव्हमेंटसारख्या अभियानांचे रथही पाहायला मिळणार आहेत.

दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवर २ महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ट्रॅक्टर मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नवे ३ कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा