बस थांब्याला अतिक्रमणाचा विळखा

 Malad
बस थांब्याला अतिक्रमणाचा विळखा
बस थांब्याला अतिक्रमणाचा विळखा
बस थांब्याला अतिक्रमणाचा विळखा
बस थांब्याला अतिक्रमणाचा विळखा
See all

मालाड - फेरीवाल्यांनी मालाड पश्चिमेकडील साईनाथ रोड इथल्या बस थांब्यालगत अतिक्रमण केलंय. या बस थांब्यावर फेरीवाल्यांनी विळखा घातल्यानं प्रवाशांना रस्त्यावर उभं राहावं लागतं. त्यातच रिक्षाचालक देखील अर्धा रस्ता व्यापून टाकतात. यासंदर्भात सहा महिन्यापूर्वी प्रवासी विक्रम कपूर यांनी पी उत्तर पालिका विभाग आणि मालाड बस आगार मॅनेजर यांच्याकडे तक्रार केली होती. तेव्हा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं कारवाई केली होती. मात्र पुन्हा फेरीवाल्यांनी आपला संसार थाटला. पुन्हा प्रवाशांकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी होतेय. याबाबत पी उत्तर पालिका सहाय्यक आयुक्त संगीता हासनाळे यांच्याकडे विचारणा केली असता, पाहणी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Loading Comments