Advertisement

माटुंगा फुलमार्केटमधील फेरीवाल्यांवर कारवाई


माटुंगा फुलमार्केटमधील फेरीवाल्यांवर कारवाई
SHARES

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने काढलेल्या संताप मोर्चामुळे मुंबईमधील सर्वच रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले हटवायला महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यानुसार, 23 ऑक्टोबरला सोमवारी माटुंगा फुलमार्केट येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

माटुंगा भांडारकर रोडवर असलेल्या फुल मार्केटमध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. माटुंग्यातील फुल मार्केट हे माटुंगा या विभागातील मोठे मार्केट असल्याने अनेक जण येथे फुलांच्या खरेदीसाठी येतात. येथे हार आणि फुलांचे अनेक स्टॉल लावलेले असतात. परंतु सोमवारी याच स्टॉलवर महापालिकेने कारवाई करत त्यांच्या काही वस्तू जप्त केल्या.


माटुंगा फुलमार्केट येथील फेरीवाल्यांकडे परवाने आहे. पण, त्यांनी अधिकृत जागेपेक्षा अधिक जागा वापरली म्हणून पालिकेने त्यांच्यावर कारवाई केली, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्याने दिली.

गेल्या 60 वर्षांपासून असलेल्या माटुंगा फुलमार्केटमधील फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. परंतु, मंजूर केलेल्या अधिकृत जागेत पूर्ववत स्टॉल बांधले जातील, असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा