Advertisement

फेरीवाले मतदानावर बहिष्कार टाकणार?


फेरीवाले मतदानावर बहिष्कार टाकणार?
SHARES

दादर - दादरच्या जुन्या बाजारातील बैठ्या फेरीवाल्यांवर पालिकेमार्फत वारंवार होत असलेल्या कारवाईमुळे फेरीवाले हवालदिल झालेत. यामुळे 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय फेरिवाल्यांनी घेतलाय. गरीब फेरीवाल्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढे येत नसल्यानं आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागत असल्याचं फेरीवाला संघाचे अध्यक्ष सोमनाथ रणदिवे यांनी सांगितलं. या शेकडो फेरीवाल्यांचे राहण्याचं ठिकाण नायगाव-वडाळा मतदार संघात असल्यामुळे आगामी 2017 मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीत रणदिवेंच्या घोषणेमुळे उमेदवारांची चांगलीच कोंडी होणार आहे. पालिकेच्या निरंतर कारवाईमुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. गेल्या 50 वर्षांपासून दादर पूर्व मध्य रेल्वे स्थानकाबाहेर शेकडो मातंग समाजाचे बैठे फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसून धंदा करीत आहेत. या धंद्यावरच त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र पालिका एफ उत्तर विभागातर्फे वारंवार होणाऱ्या कारवाईला ते कंटाळले असून, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून बैठ्या फेरीवाल्यांचा प्रश्न पालिकेने कायमचा निकाली लावावा असं त्यांचं म्हणणं आहे. 20 जुलै 2014 रोजी पालिकेनं प्रत्येकी 100 रुपये घेऊन फॉर्म भरून घेतले होते. मात्र नंतर त्याचे काय झाले हे माहित. त्यातच पालिकेच्या रोजच्या होणाऱ्या कारवाईमुळे आमचं जगणं मुश्लिक झालं असून, लेकराबाळांवर उपासमारीची वेळ आल्याचं बायम्मा रणदिवे यांनी ‘मुंबई लाईव्ह’ला सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा