बोरीवली स्थानकाजवळील बसस्टॉप फेरीवाल्यांच्या विळख्यात

 Borivali
बोरीवली स्थानकाजवळील बसस्टॉप फेरीवाल्यांच्या विळख्यात

बोरीवली - फेरीवल्यांनी बोरीवली रेल्वे स्थानकाजवळील बसस्टॉपवर अनधिकृतरित्या आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

इथे भाजी आणि फळ विकण्यासाठी फेरीवल्यांनी दुकानच थाटले आहे. त्यामुळे येथून बस पकडण्यासाठी जागाच नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तसंच याची तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न या प्रवाशांनी उपस्थित केलाय. यासंदर्भात रेल्वे पोलिसांना विचारले असता ही जागा रेल्वेच्या परिसरात येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading Comments