भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग सध्या आटोक्यात आला आहे. पण चीन आणि युरोपमधील काही देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनत आहे. गेल्या काही आठवड्यांत तेथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत भारताचीही चिंता वाढू लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, आरोग्य सचिव यांना पत्र लिहून काही खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Union Health Secretary Rajesh Bhushan writes to all Addl Chief Secys, Principal Secys, Secys (Health) of all States/UTs, emphasizing that there should be a continued focus on the five-fold strategy, i.e., Test-Track-Treat-Vaccination and adherence to COVID Appropriate Behavior. pic.twitter.com/XIqkvXR1fF
— ANI (@ANI) March 18, 2022
राजेश भूषण यांनी आपल्या पत्राद्वारे सर्वांना सांगितलं आहे की, सर्वत्र चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोना नियम या पाच धोरणांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या पाच मुद्यांवर सर्व संबंधित अधिकारी आणि विभागांनी योग्य पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. धोका लक्षात घेता डॉक्टरांनाही सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशात गेल्या २४ तासांत २ हजार ५२८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. १४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी दिवसभरात ३ हजार ९९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकुण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार १८१ वर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्ण सकारात्मक दर ०.४० इतका झाला आहे.
हेही वाचा