पालिका कार्यालय परिसरात कचरा

 Marine Drive
पालिका कार्यालय परिसरात कचरा
पालिका कार्यालय परिसरात कचरा
पालिका कार्यालय परिसरात कचरा
See all

चंदनवाडी – पालिकेच्या सी विभागीय कार्यालय परिसरात असलेल्या कल्याणजी लालजी इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर कचरा पसरला आहे. मात्र पालिका कार्यालय येथून जवळ असूनही संबंधितांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

पालिका इमारतीच्या परिसरात मोठमोठे बॅनर लावले जातात. त्याच्या फ्रेम देखील तिकडेच ठेवल्या जात आहेत. तसेच परिसरातील झाड तोडून त्याचा कचरा सुध्दा तिकडेच टाकला जातो. रोजच्या रोज कचरा उचला जात नसल्याने मच्छरींचे प्रमाण वाढून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. याबाबत रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार करूनही पालिका कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

 

Loading Comments