Advertisement

पुढील २ तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.

पुढील २ तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पुढील २ ते ३ तासात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार असून, बाहेर जाताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

याबाबत विभागाने ही माहिती नुकतीच जाहीर केली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये, तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये, आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिकमझ्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. या पूर्वी हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मंगळवार २८ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, धुळे आणि जळगावला रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा