मुंबईत मुसळधार पावसाचा कहर


  • मुंबईत मुसळधार पावसाचा कहर
SHARE

मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले, अनेक घरांमध्ये पाणी साचले. तर, काही ठिकाणी झाडे कोसळली. पाऊस थांबून अनेक तास उलटल्यानंतरही मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले.

मुंबईच्या मालाड, परळ, वांद्रे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. माहीम रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि फिश मार्केटजवळ झाड कोसळल्याने अनेक तासांपासून तेथील एक मार्ग बंद करण्यात आला होता. तेथील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर तिथे पोहचलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते झाड हटवत मार्ग मोकळा केला.

मुसळधार पावसानंतर कुर्ल्यातील कुरैशनगर येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याने एक व्यक्ती जखमी झाला. उपचारासाठी त्याला जवळच्याच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या