मुंबईसह उपनगरांत धो, धो...रेल्वे वाहतूक विस्कळीत

Mumbai
मुंबईसह उपनगरांत धो, धो...रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबईसह उपनगरांत धो, धो...रेल्वे वाहतूक विस्कळीत
See all
मुंबई  -  

मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले. मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पहायला मिळाले.


या भागात पावसाचा परिणाम

मुंबईत मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई, चांदिवली या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कुर्ला, अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ, गोरेगाव भागातही पावसानं दमदार हजेरी लावली. अंधेरी, चकाला, जेव्हीएलआर, हिंदमाता परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं.

मुंबई आणि उपनगरात सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी झालेल्या दमदार पावसाने पवई तलावाजवळच्या रस्त्यावर तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.


लोकलवरही परिणाम

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुसळधार पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे अनेक स्थानकांवर ट्रेनची वाट पहात असलेल्या मुंबईकरांची गर्दी पहायला मिळाली.

 मुंबईसह देशभरात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.हे देखील वाचा -

मुंबईत यंदा झाला 60% जास्त पाऊसडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.