Advertisement

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून २४ तासांत हे अधिक तीव्र होण्याची व पुढच्या ३-४ दिवसांत पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.

मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसानं मागील काही दिवसांपासून बॅटींग करण्यास सुरूवात केली आहे. सध्या मुंबईत ढगाळ वातावरण असून, थंड वारे वाहत आहेत. त्यामुळं मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळं मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता असून, महापालिकेनं बुधवारी मुंबईतील २० टक्के पाणीकपात ही १० टक्क्यावर आणली आहे.

मुंबईत कुलाबा आणि सांताक्रुझ इथं बुधवारी सकाळी ८.३० वाजता अनुक्रमे १३, ११.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी किंचित कोसळलेल्या पावसानं त्यानंतर विश्रांती घेतली. मुंबईत पडत असलेल्या पावसामुळं ठिकठिकाणी पडझड सुरूच होती. ४ ठिकाणी घरांचा भाग कोसळला. ८ ठिकाणी झाडे पडली तर ७ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

हवामान विभागानं येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून २४ तासांत हे अधिक तीव्र होण्याची व पुढच्या ३-४ दिवसांत पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे.

मुंबईत १० टक्के पाणीकपात

मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून मुंबई १० टक्के पाणीकपात लागू राहणार असल्याचं मुंबई पालिकेने म्हटलं आहे. जून आणि जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक नव्हता. त्यामुळे ५ ऑगस्ट पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात  करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्याट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली.



हेही वाचा -

Mumbai Rains : गणेशोत्सवावर वादळी पावसाचं संकट, मुंबई-ठाण्यात अलर्ट

गुड न्यूज! गुरूवारपासून जिल्ह्याच्या बाहेरही धावणार लालपरी!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा