Advertisement

Mumbai Rains : गणेशोत्सवावर वादळी पावसाचं संकट, मुंबई-ठाण्यात अलर्ट

येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Rains : गणेशोत्सवावर वादळी पावसाचं संकट, मुंबई-ठाण्यात अलर्ट
SHARES

येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे शहरांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे. एवढेच नाही तर गणरायाच्या आगमना दिवशी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

१९ ऑगस्टपासून उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता  आहे. त्यामुळे पुढच्या २४ तासांत पावसाचा जोर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढच्या 3-4 दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी येत्या ४ ते ५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : गुड न्यूज ! मुंबईला पाणीपुरवठा करणारं आणखी एक धरण भरलं

दरम्यान १ जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत दरवर्षी सरासरी ७१३.७ मिलिमीटर पाऊस होतो. परंतु, यंदा ८२६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसंच, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर या ६ जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविण्यात आला.

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जून, जुलै महिन्यात कोकण मराठवाड्यासह राज्याच्या काही भागातच सक्रीय असलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात मुंबईसह राज्यात सर्वदूर बरसल्याने महाराष्ट्र सुखावला आहे.

विशेष म्हणजे पावसाचा चांगला जोर असल्याने धरणेही भरू लागली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार व तुळशी तलाव भरून वाहू लागलं आहेत. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा हे मोठं तलाव जवळपास ९० टक्के भरले आहेत.



हेही वाचा

मुंबईला पाणीपुरवठा करणारं 'हे' तलावही ओव्हरफ्लो

यंदा १६ टक्के जास्त पाऊस, पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा