Advertisement

मुंबईत २१ ऑगस्टपासून २० टक्क्यांऐवजी १० टक्के पाणीकपात

मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे.

मुंबईत २१ ऑगस्टपासून २० टक्क्यांऐवजी १० टक्के पाणीकपात
SHARES

मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असल्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांवर करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून मुंबई १० टक्के पाणीकपात लागू राहणार असल्याचं मुंबई पालिकेने म्हटलं आहे. 

जून आणि जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक नव्हता. त्यामुळे ५ ऑगस्ट पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात  करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्याट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली.

यामुळे आवश्यक जलसाठ्याच्या ८५ टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे २० टक्के होत असलेली पाणीकपात आता १० टक्के असणार आहे. ही पाणी कपात मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांनादेखील लागू राहणार आहे. 



हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये तलाव, चौपाट्यांवर गणपती विसर्जनास बंदी

'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा